१ |
अहीथोफेल अबशालोमाला म्हणाला, “मला परवानगी दे म्हणजे मी बारा हजार पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो, |
२ |
तो थकला-भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन; त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील; आणि मग मी राजालाच तेवढे मारीन; |
३ |
आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन; ज्याच्यामागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे; ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील.” |
४ |
ही गोष्ट अबशालोमाला व इस्राएलाच्या सर्व वडील जनांना पसंत पडली. |
५ |
मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.” |
६ |
हूशय आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेल अमुक अमुक मसलत देत आहे; त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाहीतर तू तरी काही मसलत सांग.” |
७ |
हूशय अबशालोमाला म्हणाला, “अहीथोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही.” |
८ |
हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही. |
९ |
पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल. |
१० |
म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत. |
११ |
माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा. |
१२ |
मग तो असेल तेथे त्याच्यावर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दंव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू म्हणजे त्याचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही. |
१३ |
तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्राएल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकतील; तेथे एक खडाही राहणार नाही.” |
१४ |
अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती. |
१५ |
मग हूशयाने सादोक व अब्याथार याजक ह्यांना सांगितले की, “अहीथोफेलाने अबशालोमाला व इस्राएलाच्या वडील जनांना अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली. |
१६ |
तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.” |
१७ |
योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले. |
१८ |
पण एका पोराने त्यांना पाहून अबशालोमाला जाऊन सांगितले; तेव्हा ते त्वरेने निघून बहूरीमातील एका मनुष्याच्या घरी गेले; त्याच्या चौकात एक विहीर होती तिच्यात ते उतरले. |
१९ |
तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व तिच्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही. |
२० |
अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले. |
२१ |
ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले; त्यांनी जाऊन दावीद राजाला खबर दिली, आणि ते दाविदाला म्हणाले, “उठा, नदीचा पार उतरून लवकर पलीकडे जा; अहीथोफेलाची तुमच्याविरुद्ध अमुक अमुक मसलत आहे.” |
२२ |
तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देनेपार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही. |
२३ |
आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले. |
२४ |
मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला. |
२५ |
अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय. |
२६ |
इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला. |
२७ |
दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो-दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्लय गिलादी ह्यांनी |
२८ |
दाविदासाठी व त्याच्याबरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे, |
२९ |
मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ शमुवेल १७:1 |
२ शमुवेल १७:2 |
२ शमुवेल १७:3 |
२ शमुवेल १७:4 |
२ शमुवेल १७:5 |
२ शमुवेल १७:6 |
२ शमुवेल १७:7 |
२ शमुवेल १७:8 |
२ शमुवेल १७:9 |
२ शमुवेल १७:10 |
२ शमुवेल १७:11 |
२ शमुवेल १७:12 |
२ शमुवेल १७:13 |
२ शमुवेल १७:14 |
२ शमुवेल १७:15 |
२ शमुवेल १७:16 |
२ शमुवेल १७:17 |
२ शमुवेल १७:18 |
२ शमुवेल १७:19 |
२ शमुवेल १७:20 |
२ शमुवेल १७:21 |
२ शमुवेल १७:22 |
२ शमुवेल १७:23 |
२ शमुवेल १७:24 |
२ शमुवेल १७:25 |
२ शमुवेल १७:26 |
२ शमुवेल १७:27 |
२ शमुवेल १७:28 |
२ शमुवेल १७:29 |
|
|
|
|
|
|
२ शमुवेल 1 / २शमुवे 1 |
२ शमुवेल 2 / २शमुवे 2 |
२ शमुवेल 3 / २शमुवे 3 |
२ शमुवेल 4 / २शमुवे 4 |
२ शमुवेल 5 / २शमुवे 5 |
२ शमुवेल 6 / २शमुवे 6 |
२ शमुवेल 7 / २शमुवे 7 |
२ शमुवेल 8 / २शमुवे 8 |
२ शमुवेल 9 / २शमुवे 9 |
२ शमुवेल 10 / २शमुवे 10 |
२ शमुवेल 11 / २शमुवे 11 |
२ शमुवेल 12 / २शमुवे 12 |
२ शमुवेल 13 / २शमुवे 13 |
२ शमुवेल 14 / २शमुवे 14 |
२ शमुवेल 15 / २शमुवे 15 |
२ शमुवेल 16 / २शमुवे 16 |
२ शमुवेल 17 / २शमुवे 17 |
२ शमुवेल 18 / २शमुवे 18 |
२ शमुवेल 19 / २शमुवे 19 |
२ शमुवेल 20 / २शमुवे 20 |
२ शमुवेल 21 / २शमुवे 21 |
२ शमुवेल 22 / २शमुवे 22 |
२ शमुवेल 23 / २शमुवे 23 |
२ शमुवेल 24 / २शमुवे 24 |