१ |
शौलाच्या मृत्यूनंतर दावीद अमालेक्यांचा संहार करून परत सिकलाग येथे दोन दिवस राहिला; |
२ |
ह्यानंतर तिसर्या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले. |
३ |
दाविदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” तो त्याला म्हणाला, “मी इस्राएलाच्या छावणीतून निभावून आलो आहे.” |
४ |
दाविदाने त्याला विचारले, “कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे.” तो म्हणाला, “लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले; शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले.” |
५ |
दाविदाने बातमी आणणार्या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?” |
६ |
तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले. |
७ |
शौलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारली; तेव्हा मी म्हणालो, ‘काय आज्ञा?’ |
८ |
तो मला म्हणाला, ‘तू कोण आहेस?’ मी त्याला म्हणालो, ‘मी अमालेकी आहे.’ |
९ |
तो मला म्हणाला, ‘माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर; मला यातना होत आहेत तरी माझा प्राण अद्यापि कायमच आहे.’ |
१० |
तेव्हा मी त्याच्याजवळ उभे राहून त्याचा वध केला, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती. मी त्याच्या मस्तकावरचा मुकुट व त्याची बाहुभूषणे काढून येथे माझ्या स्वामीजवळ आणली आहेत.” |
११ |
हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले. |
१२ |
शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले. |
१३ |
मग दाविदाने आपल्याला बातमी देणार्या त्या तरुण मनुष्याला विचारले, “तू कोठला?” तो म्हणाला, “मी एका परदेशीयाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे.” |
१४ |
दावीद त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करायला हात चालवण्याची तुला भीती कशी नाही वाटली?” |
१५ |
दाविदाने एका तरुणाला बोलावून सांगितले, “जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला कर.” त्याने त्याच्यावर असा वार केला की तो मेलाच. |
१६ |
दावीद त्याला म्हणाला, “तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो; परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे.” |
१७ |
मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले; |
१८ |
आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे: |
१९ |
“हे इस्राएला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधला आहे. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! |
२० |
गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो. |
२१ |
गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे. |
२२ |
वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे. |
२३ |
शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. |
२४ |
इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा; तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारित असे; तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे. |
२५ |
रणभूमीवर बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! योनाथाना, तू उच्च स्थानी वधला गेला आहेस! |
२६ |
माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. |
२७ |
बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत!”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ शमुवेल १:1 |
२ शमुवेल १:2 |
२ शमुवेल १:3 |
२ शमुवेल १:4 |
२ शमुवेल १:5 |
२ शमुवेल १:6 |
२ शमुवेल १:7 |
२ शमुवेल १:8 |
२ शमुवेल १:9 |
२ शमुवेल १:10 |
२ शमुवेल १:11 |
२ शमुवेल १:12 |
२ शमुवेल १:13 |
२ शमुवेल १:14 |
२ शमुवेल १:15 |
२ शमुवेल १:16 |
२ शमुवेल १:17 |
२ शमुवेल १:18 |
२ शमुवेल १:19 |
२ शमुवेल १:20 |
२ शमुवेल १:21 |
२ शमुवेल १:22 |
२ शमुवेल १:23 |
२ शमुवेल १:24 |
२ शमुवेल १:25 |
२ शमुवेल १:26 |
२ शमुवेल १:27 |
|
|
|
|
|
|
२ शमुवेल 1 / २शमुवे 1 |
२ शमुवेल 2 / २शमुवे 2 |
२ शमुवेल 3 / २शमुवे 3 |
२ शमुवेल 4 / २शमुवे 4 |
२ शमुवेल 5 / २शमुवे 5 |
२ शमुवेल 6 / २शमुवे 6 |
२ शमुवेल 7 / २शमुवे 7 |
२ शमुवेल 8 / २शमुवे 8 |
२ शमुवेल 9 / २शमुवे 9 |
२ शमुवेल 10 / २शमुवे 10 |
२ शमुवेल 11 / २शमुवे 11 |
२ शमुवेल 12 / २शमुवे 12 |
२ शमुवेल 13 / २शमुवे 13 |
२ शमुवेल 14 / २शमुवे 14 |
२ शमुवेल 15 / २शमुवे 15 |
२ शमुवेल 16 / २शमुवे 16 |
२ शमुवेल 17 / २शमुवे 17 |
२ शमुवेल 18 / २शमुवे 18 |
२ शमुवेल 19 / २शमुवे 19 |
२ शमुवेल 20 / २शमुवे 20 |
२ शमुवेल 21 / २शमुवे 21 |
२ शमुवेल 22 / २शमुवे 22 |
२ शमुवेल 23 / २शमुवे 23 |
२ शमुवेल 24 / २शमुवे 24 |