१ |
मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. |
२ |
योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली; त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्राएलाच्या प्रेतात मसाला भरला. |
३ |
ह्या कामाला चाळीस दिवस लागले; प्रेतात मसाला भरायला इतके दिवस लागत असत; आणि मिसरी लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला. |
४ |
शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकांना म्हणाला, “तुमची कृपादृष्टी माझ्यावर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की, |
५ |
माझ्या बापाने माझ्याकडून आणभाक घेऊन म्हटले की, ‘पाहा, मी आता मरणार; तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदवून घेतली आहे तिच्यात मला नेऊन मूठमाती दे.’ मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरू द्यावे. मी परत येईन.” |
६ |
फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.” |
७ |
मग योसेफ आपल्या बापाला मूठमाती देण्यास निघून गेला, आणि फारोचे सर्व सेवक, त्याच्या घराण्यांतले वडील जन व मिसर देशातले सर्व वडील जन, |
८ |
योसेफाच्या घरचे सर्व लोक त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याच्याबरोबर गेले; आपली मुलेबाळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली. |
९ |
त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले; असा तो मोठा समुदाय निघाला. |
१० |
यार्देनेपलीकडे अटादाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा त्यांनी तेथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाने तेथे आपल्या बापासाठी फार आकांत करून सात दिवस शोक केला. |
११ |
देशातले रहिवासी कनानी ह्यांनी तो शोक पाहिला तेव्हा ते म्हणाले, ‘हा मिसरी लोकांचा भारी शोक आहे;’ त्यावरून त्या ठिकाणाचे नाव आबेल-मिस्राईम (मिसराचा शोक) पडले; ते यार्देनेपलीकडे आहे. |
१२ |
इस्राएलाने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले; |
१३ |
त्यांनी त्याला कनान देशात नेऊन मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत मूठमाती दिली; अब्राहामाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा. |
१४ |
योसेफाने आपल्या बापाला मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्या-बरोबर गेले होते ते सर्व मिसर देशाला परत गेले. |
१५ |
आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.” |
१६ |
त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की, “आपल्या बापाने मरणापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी: |
१७ |
तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. |
१८ |
तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” |
१९ |
योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? |
२० |
तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. |
२१ |
तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. |
२२ |
योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला. |
२३ |
योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. |
२४ |
नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.” |
२५ |
मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.” |
२६ |
योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्पत्ति ५०:1 |
उत्पत्ति ५०:2 |
उत्पत्ति ५०:3 |
उत्पत्ति ५०:4 |
उत्पत्ति ५०:5 |
उत्पत्ति ५०:6 |
उत्पत्ति ५०:7 |
उत्पत्ति ५०:8 |
उत्पत्ति ५०:9 |
उत्पत्ति ५०:10 |
उत्पत्ति ५०:11 |
उत्पत्ति ५०:12 |
उत्पत्ति ५०:13 |
उत्पत्ति ५०:14 |
उत्पत्ति ५०:15 |
उत्पत्ति ५०:16 |
उत्पत्ति ५०:17 |
उत्पत्ति ५०:18 |
उत्पत्ति ५०:19 |
उत्पत्ति ५०:20 |
उत्पत्ति ५०:21 |
उत्पत्ति ५०:22 |
उत्पत्ति ५०:23 |
उत्पत्ति ५०:24 |
उत्पत्ति ५०:25 |
उत्पत्ति ५०:26 |
|
|
|
|
|
|
उत्पत्ति 1 / उत्पत्ति 1 |
उत्पत्ति 2 / उत्पत्ति 2 |
उत्पत्ति 3 / उत्पत्ति 3 |
उत्पत्ति 4 / उत्पत्ति 4 |
उत्पत्ति 5 / उत्पत्ति 5 |
उत्पत्ति 6 / उत्पत्ति 6 |
उत्पत्ति 7 / उत्पत्ति 7 |
उत्पत्ति 8 / उत्पत्ति 8 |
उत्पत्ति 9 / उत्पत्ति 9 |
उत्पत्ति 10 / उत्पत्ति 10 |
उत्पत्ति 11 / उत्पत्ति 11 |
उत्पत्ति 12 / उत्पत्ति 12 |
उत्पत्ति 13 / उत्पत्ति 13 |
उत्पत्ति 14 / उत्पत्ति 14 |
उत्पत्ति 15 / उत्पत्ति 15 |
उत्पत्ति 16 / उत्पत्ति 16 |
उत्पत्ति 17 / उत्पत्ति 17 |
उत्पत्ति 18 / उत्पत्ति 18 |
उत्पत्ति 19 / उत्पत्ति 19 |
उत्पत्ति 20 / उत्पत्ति 20 |
उत्पत्ति 21 / उत्पत्ति 21 |
उत्पत्ति 22 / उत्पत्ति 22 |
उत्पत्ति 23 / उत्पत्ति 23 |
उत्पत्ति 24 / उत्पत्ति 24 |
उत्पत्ति 25 / उत्पत्ति 25 |
उत्पत्ति 26 / उत्पत्ति 26 |
उत्पत्ति 27 / उत्पत्ति 27 |
उत्पत्ति 28 / उत्पत्ति 28 |
उत्पत्ति 29 / उत्पत्ति 29 |
उत्पत्ति 30 / उत्पत्ति 30 |
उत्पत्ति 31 / उत्पत्ति 31 |
उत्पत्ति 32 / उत्पत्ति 32 |
उत्पत्ति 33 / उत्पत्ति 33 |
उत्पत्ति 34 / उत्पत्ति 34 |
उत्पत्ति 35 / उत्पत्ति 35 |
उत्पत्ति 36 / उत्पत्ति 36 |
उत्पत्ति 37 / उत्पत्ति 37 |
उत्पत्ति 38 / उत्पत्ति 38 |
उत्पत्ति 39 / उत्पत्ति 39 |
उत्पत्ति 40 / उत्पत्ति 40 |
उत्पत्ति 41 / उत्पत्ति 41 |
उत्पत्ति 42 / उत्पत्ति 42 |
उत्पत्ति 43 / उत्पत्ति 43 |
उत्पत्ति 44 / उत्पत्ति 44 |
उत्पत्ति 45 / उत्पत्ति 45 |
उत्पत्ति 46 / उत्पत्ति 46 |
उत्पत्ति 47 / उत्पत्ति 47 |
उत्पत्ति 48 / उत्पत्ति 48 |
उत्पत्ति 49 / उत्पत्ति 49 |
उत्पत्ति 50 / उत्पत्ति 50 |