A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

उत्पत्ति ४६तेव्हा इस्राएल आपल्या सर्वांसह निघून बैरशेबास आला; तेथे त्याने आपला पिता इसहाक ह्याच्या देवाला यज्ञ केले.
तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”
तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन.
मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.”
मग याकोब बैर-शेबाहून निघाला, आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यांत इस्राएलाच्या मुलांनी आपला पिता याकोब आणि आपली बायकामुले बसवून नेली.
ते आपली गुरेढोरे आणि कनान देशात मिळवलेले धन घेऊन मिसर देशात आले; ह्याप्रमाणे याकोब व त्याची सर्व संतती मिसर देशात आली;
त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे सर्व संतती मिसरात आणली.
इस्राएलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्रपौत्र मिसरात गेले त्यांची नावे ही: याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन,
रऊबेनाचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कार्मी.
१०
शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहाद, याकीन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.
११
लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी.
१२
यहूदाचे मुलगे: एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.
१३
इस्साखाराचे मुलगे तोला, पुवा, योब व शिम्रोन.
१४
जबुलूनाचे मुलगे सेरेद, एलोन व याहलेल.
१५
हे सर्व लेआचे मुलगे व तिची मुलगी दीना ही तिला याकोबापासून पदन-अरामात झाली; त्याचे मुलगे व मुली मिळून तेहेतीस जण होते.
१६
गादाचे मुलगे सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी अरोदी व अरेली.
१७
आशेराचे मुलगे इम्ना, इश्वा, इश्वी व बरीया; आणि त्यांची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.
१८
लाबानाने आपली मुलगी लेआ हिला दिलेल्या जिल्पेचे हे मुलगे, तिला हे सोळा जण याकोबापासून झाले.
१९
याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे योसेफ व बन्यामीन.
२०
मिसर देशात ओनचा याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफाला मनश्शे व एफ्राईम हे झाले.
२१
बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
२२
हे मुलगे याकोबापासून राहेलीला झाले; ते सर्व चौदा जण होते.
२३
दानाचा मुलगा हुशीम.
२४
नफतालीचे मुलगे यासहेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.
२५
लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे हे मुलगे. तिला हे सात जण याकोबापासून झाले.
२६
याकोबाच्या वंशातली जी माणसे मिसरात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून सहासष्ट होती.
२७
योसेफाला मिसर देशात झालेले दोन मुलगे हे मिळून याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात आले ते एकंदर सत्तर जण होते.
२८
योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहूदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; ह्याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले.
२९
योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल ह्याला भेटायला गोशेन प्रांतास गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.
३०
तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.”
३१
योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या बापाच्या घरच्यांना म्हणाला, “मी जाऊन फारोला खबर देतो की, कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे माझ्याकडे आली आहेत;
३२
हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत म्हणून ते आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत.
३३
फारो तुम्हांला बोलावून विचारील की, ‘तुमचा धंदा काय आहे?’
३४
तेव्हा तुम्ही सांगा की, ‘बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत, आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे.’ अशाने तुम्हांला गोशेन प्रांतात राहायला मिळेल; कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकांना किळस वाटते.”उत्पत्ति ४६:1
उत्पत्ति ४६:2
उत्पत्ति ४६:3
उत्पत्ति ४६:4
उत्पत्ति ४६:5
उत्पत्ति ४६:6
उत्पत्ति ४६:7
उत्पत्ति ४६:8
उत्पत्ति ४६:9
उत्पत्ति ४६:10
उत्पत्ति ४६:11
उत्पत्ति ४६:12
उत्पत्ति ४६:13
उत्पत्ति ४६:14
उत्पत्ति ४६:15
उत्पत्ति ४६:16
उत्पत्ति ४६:17
उत्पत्ति ४६:18
उत्पत्ति ४६:19
उत्पत्ति ४६:20
उत्पत्ति ४६:21
उत्पत्ति ४६:22
उत्पत्ति ४६:23
उत्पत्ति ४६:24
उत्पत्ति ४६:25
उत्पत्ति ४६:26
उत्पत्ति ४६:27
उत्पत्ति ४६:28
उत्पत्ति ४६:29
उत्पत्ति ४६:30
उत्पत्ति ४६:31
उत्पत्ति ४६:32
उत्पत्ति ४६:33
उत्पत्ति ४६:34


उत्पत्ति 1 / उत्पत्ति 1
उत्पत्ति 2 / उत्पत्ति 2
उत्पत्ति 3 / उत्पत्ति 3
उत्पत्ति 4 / उत्पत्ति 4
उत्पत्ति 5 / उत्पत्ति 5
उत्पत्ति 6 / उत्पत्ति 6
उत्पत्ति 7 / उत्पत्ति 7
उत्पत्ति 8 / उत्पत्ति 8
उत्पत्ति 9 / उत्पत्ति 9
उत्पत्ति 10 / उत्पत्ति 10
उत्पत्ति 11 / उत्पत्ति 11
उत्पत्ति 12 / उत्पत्ति 12
उत्पत्ति 13 / उत्पत्ति 13
उत्पत्ति 14 / उत्पत्ति 14
उत्पत्ति 15 / उत्पत्ति 15
उत्पत्ति 16 / उत्पत्ति 16
उत्पत्ति 17 / उत्पत्ति 17
उत्पत्ति 18 / उत्पत्ति 18
उत्पत्ति 19 / उत्पत्ति 19
उत्पत्ति 20 / उत्पत्ति 20
उत्पत्ति 21 / उत्पत्ति 21
उत्पत्ति 22 / उत्पत्ति 22
उत्पत्ति 23 / उत्पत्ति 23
उत्पत्ति 24 / उत्पत्ति 24
उत्पत्ति 25 / उत्पत्ति 25
उत्पत्ति 26 / उत्पत्ति 26
उत्पत्ति 27 / उत्पत्ति 27
उत्पत्ति 28 / उत्पत्ति 28
उत्पत्ति 29 / उत्पत्ति 29
उत्पत्ति 30 / उत्पत्ति 30
उत्पत्ति 31 / उत्पत्ति 31
उत्पत्ति 32 / उत्पत्ति 32
उत्पत्ति 33 / उत्पत्ति 33
उत्पत्ति 34 / उत्पत्ति 34
उत्पत्ति 35 / उत्पत्ति 35
उत्पत्ति 36 / उत्पत्ति 36
उत्पत्ति 37 / उत्पत्ति 37
उत्पत्ति 38 / उत्पत्ति 38
उत्पत्ति 39 / उत्पत्ति 39
उत्पत्ति 40 / उत्पत्ति 40
उत्पत्ति 41 / उत्पत्ति 41
उत्पत्ति 42 / उत्पत्ति 42
उत्पत्ति 43 / उत्पत्ति 43
उत्पत्ति 44 / उत्पत्ति 44
उत्पत्ति 45 / उत्पत्ति 45
उत्पत्ति 46 / उत्पत्ति 46
उत्पत्ति 47 / उत्पत्ति 47
उत्पत्ति 48 / उत्पत्ति 48
उत्पत्ति 49 / उत्पत्ति 49
उत्पत्ति 50 / उत्पत्ति 50