A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

उत्पत्ति ४५तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, “सर्व लोकांना बाहेर घालवा.” योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते.
तो मोठमोठ्याने रडू लागला, ते मिसरी लोकांनी ऐकले, आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले.
योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे; माझा बाप अजून जिवंत आहे काय?” त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्यापुढे अतिशय घाबरले.
योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “अंमळ जवळ या.” आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच.
तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले.
ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही.
देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे.
तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की, देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका;
१०
तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्वकाही घेऊन माझ्याजवळ राहावे.
११
कारण पाच वर्षे दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही.
१२
पाहा, मी योसेफ तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन ह्याच्या डोळ्यांना दिसतच आहे.
१३
मिसरातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करा व माझ्या बापास इकडे घेऊन या.”
१४
तो आपला भाऊ बन्यामीन ह्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला.
१५
आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले.
१६
योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहचली. ती ऐकून फारोला व त्याच्या चाकरांना आनंद झाला.
१७
फारो योसेफाला म्हणाला, “तू आपल्या भावांना सांग, एवढे करा की, आपली जनावरे लादून निघा व कनान देशाला जा;
१८
आणि आपला बाप व आपली मुलेमाणसे ह्यांना घेऊन माझ्याकडे या, म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हांला देईन व ह्या देशातले उत्तम पदार्थ तुम्हांला खायला मिळतील.
१९
आता तुला माझी आज्ञा आहे की, तुम्ही एवढे करा: आपल्या बायकामुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापालाही घेऊन या.
२०
आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, सार्‍या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.”
२१
इस्राएलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकुमाप्रमाणे योसेफाने त्यांना गाड्या व वाटेची शिधासामग्री दिली.
२२
त्याने प्रत्येकाला एकेक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनाला तीनशे रुपये आणि पाच नवे पोशाख दिले.
२३
त्याचप्रमाणे त्याने आपल्या बापासाठी मिसरातील उत्कृष्ट पदार्थ लादलेली दहा गाढवे आणि धान्य, भाकरी व वाटेसाठी इतर अन्नसामग्री ह्यांनी लादलेल्या दहा गाढवी रवाना केल्या.
२४
ह्या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले; जाताना तो त्यांना म्हणाला, “सांभाळा, वाटेत भांडू नका.”
२५
ते मिसरातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले.
२६
योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना.
27
मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जिवात जीव आला.
28
आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.”उत्पत्ति ४५:1
उत्पत्ति ४५:2
उत्पत्ति ४५:3
उत्पत्ति ४५:4
उत्पत्ति ४५:5
उत्पत्ति ४५:6
उत्पत्ति ४५:7
उत्पत्ति ४५:8
उत्पत्ति ४५:9
उत्पत्ति ४५:10
उत्पत्ति ४५:11
उत्पत्ति ४५:12
उत्पत्ति ४५:13
उत्पत्ति ४५:14
उत्पत्ति ४५:15
उत्पत्ति ४५:16
उत्पत्ति ४५:17
उत्पत्ति ४५:18
उत्पत्ति ४५:19
उत्पत्ति ४५:20
उत्पत्ति ४५:21
उत्पत्ति ४५:22
उत्पत्ति ४५:23
उत्पत्ति ४५:24
उत्पत्ति ४५:25
उत्पत्ति ४५:26
उत्पत्ति ४५:27
उत्पत्ति ४५:28


उत्पत्ति 1 / 1Mo 1
उत्पत्ति 2 / 1Mo 2
उत्पत्ति 3 / 1Mo 3
उत्पत्ति 4 / 1Mo 4
उत्पत्ति 5 / 1Mo 5
उत्पत्ति 6 / 1Mo 6
उत्पत्ति 7 / 1Mo 7
उत्पत्ति 8 / 1Mo 8
उत्पत्ति 9 / 1Mo 9
उत्पत्ति 10 / 1Mo 10
उत्पत्ति 11 / 1Mo 11
उत्पत्ति 12 / 1Mo 12
उत्पत्ति 13 / 1Mo 13
उत्पत्ति 14 / 1Mo 14
उत्पत्ति 15 / 1Mo 15
उत्पत्ति 16 / 1Mo 16
उत्पत्ति 17 / 1Mo 17
उत्पत्ति 18 / 1Mo 18
उत्पत्ति 19 / 1Mo 19
उत्पत्ति 20 / 1Mo 20
उत्पत्ति 21 / 1Mo 21
उत्पत्ति 22 / 1Mo 22
उत्पत्ति 23 / 1Mo 23
उत्पत्ति 24 / 1Mo 24
उत्पत्ति 25 / 1Mo 25
उत्पत्ति 26 / 1Mo 26
उत्पत्ति 27 / 1Mo 27
उत्पत्ति 28 / 1Mo 28
उत्पत्ति 29 / 1Mo 29
उत्पत्ति 30 / 1Mo 30
उत्पत्ति 31 / 1Mo 31
उत्पत्ति 32 / 1Mo 32
उत्पत्ति 33 / 1Mo 33
उत्पत्ति 34 / 1Mo 34
उत्पत्ति 35 / 1Mo 35
उत्पत्ति 36 / 1Mo 36
उत्पत्ति 37 / 1Mo 37
उत्पत्ति 38 / 1Mo 38
उत्पत्ति 39 / 1Mo 39
उत्पत्ति 40 / 1Mo 40
उत्पत्ति 41 / 1Mo 41
उत्पत्ति 42 / 1Mo 42
उत्पत्ति 43 / 1Mo 43
उत्पत्ति 44 / 1Mo 44
उत्पत्ति 45 / 1Mo 45
उत्पत्ति 46 / 1Mo 46
उत्पत्ति 47 / 1Mo 47
उत्पत्ति 48 / 1Mo 48
उत्पत्ति 49 / 1Mo 49
उत्पत्ति 50 / 1Mo 50