जुना करार
नवीन करार
मराठी बायबल 1826
← १०३

स्तोत्र १०४

१०५ →

माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.

माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.

देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस. तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.

देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस आणि तुझ्या सेवकांना78 अग्रीसारखे.

देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेनेउ भारलेस की तिचा कधीही नाश होणार नाही.

तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस, पाण्याने डोंगरही झाकले गेले.

परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले. देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.

पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.

तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.

१०

देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.

११

झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात. रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.

१२

पानपक्षी तेथे वस्ती करतात. ते जवळच्याच झाडांच्या फांद्यांवर बसून गातात.

१३

देव डोंगरावर पाऊस पाठवतो. देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.

१४

देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.

१५

देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली कातडी मऊ करणारे तेल देतो आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.

१६

लबानोन मधले मोठे देवदार वूक्ष परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो.

१७

पक्षी त्या झाडांत आपली घरटी बांधतात. मोठे करकोचे देवदारूच्या झाडातच राहातात.

१८

रानबकऱ्या उंच पर्वतावर राहातात. मोठ मोठे खडक कोल्ह प्राण्याची लपून बसायची जागा आहे.

१९

देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.

२०

तू काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात आणि इकडे तिकडे फिरतात.

२१

सिंह हल्ला करताना गर्जना करतात. जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत.

२२

नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी आपापल्या घरी परत जाऊन विश्रांती घेतात.

२३

नंतर लोक त्यांचे काम करायला जातात आणि ते संध्याकाळपर्यंत काम करतात.

२४

परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.

२५

समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे! आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजता न येण्याइतके.

२६

समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान, तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.

२७

देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.

२८

देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस. तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.

२९

आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात. त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात. ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.

३०

पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.

३१

परमेश्वराचे वैभव सदैव राहो! परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.

३२

परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते. त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.

३३

मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.

३४

मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.

३५

पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

Marathi Bible 1826
Public Domain 1826